अन्यथा अॅपलचे फोन हिंदुस्थानात चालणार नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

हिंदुस्थानात अॅन्ड्रॉईडसह अॅपलच्या वापरकर्त्यांची संख्या लक्षणीय आहे. पण सध्या ट्राय आणि अॅपलमध्ये एका अॅपवरून खडाजंगी झाली असून हिंदुस्थानात अॅपलचे फोन बंद होतील की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

फेक कॉल्स आणि स्पॅम मेसेजचा त्रास मोबाईल वापरकर्त्यांना होऊ नये म्हणून ट्रायने DND 2.0 या अॅपची निर्मिती केली आहे. हे अॅप सध्या अॅन्ड्रॉईडच्या प्लेस्टोअर वर उपलब्ध आहे. पण अॅपलने आपल्या आय स्टोरमध्ये या अॅपला जागा दिलेली नाही. मोबाईल वापरकर्त्याने हे अॅप डाऊनलोड केल्यास फ़ेक कॉल्स आणि स्पॅम मेसेजपासून त्याची सुटक होईल. पण अॅपलने या अॅपला आपल्या स्टोअरमध्ये जागा दिली नाही आणि त्यावर स्पष्टीकरण देताना सांगितले की हे अॅप वापरण्यासाठी युजर्सचे फोन कॉल रेकॉर्ड करण्याची परवानगी हे अॅप मागते. त्यामुळे युजर्सच्या खाजगी आयुष्यावर गदा येते. यासाठी अॅपल स्वतः एक DND अॅपची निर्मिती करत आहे.

ट्रायने यासंदर्भात दूरसंचार सेवा पूरवणार्‍या एअरटेल आणि व्होडाफोन कंपन्यांना यासंबंधी नोटिस पाठवली आहे. जर अॅपलने आपल्या स्टोरमध्ये या अॅपला जागा नाही दिली तर हिंदुस्थानी नेटवर्कमध्ये अॅपलचे फोन चालणार नाही. त्यामुळे अॅपलचे फोन वापरणार्‍यांना नाहक मनस्ताप भोगावा लागेल.