
सामना प्रतिनिधी । संभाजीनगर
काकासाहेब शिंदे या तरुणाने घेतलेल्या जलसमाधीनंतर आता मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू केलेल्या आंदोलनाची तीव्रता अधिक वाढली आहे. संभाजीनगर जिल्ह्यात आणखी एका मराठा तरुणाने नदी पात्रात उडी घेतली आहे. हा तरुण जखमी असून त्याला घाटी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळते आहे.
संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात देवगाव रंगारी येथे जयंत द्वारकादास सोनवणे (वय २५ वर्ष) याने वेणगंगा नदी पात्रात उडी घेतल्याची माहिती मिळते आहे. ही नदी कोरडी असल्याने तरुण जखमी झाला असून त्याला उपचारासाठी घाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
दरम्यान, मराठा आंदोलक आणि काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबीयांच्या मागण्या मान्य केल्यानंतर त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.




























































