
सामना प्रतिनिधी । लातूर
शहरातील बार्शीरोडवरील डॉक्टरांचे क्लिनीक काही युवकांनी फोडल्याची घटना घडली. जाणीवपूर्वक हे कृत्य करण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेचा मात्र निषेध व्यक्त केला जात आहे.
शहरातील बार्शीरोडजवळील पद्मा नगर भागात असणारे लड्डा आयुर्वेदिक चिकित्सालय येथे काही समाजकंटकानी बंदचे आवाहन करीत निष्कारण हल्ला केला आणि तोडफोड केली. अत्यावश्यक सेवेसाठी बांधील असलेल्या दवाखान्यात येऊन दवाखान्यातील काचा फोडल्या, महिला कर्मचाऱ्याशी असभ्य वर्तन केले, मुख्य केबिन मध्ये येऊन संगणकाचे नुकसान केले, रुग्ण पत्रकांची फेकफाक केली अशी माहिती डॉ. पवन लड्डा यांनी दिली. मुख्य रस्त्यापासून दूर बोळात असणारे हे चिकित्सालय फोडण्याचा उद्देश वेगळाच असावा. जाणीवपूर्वक हे कृत्य केले असावे असे म्हटले जात आहे.





























































