साताऱ्यात आंदोलकांची पोलिसांच्या ताफ्यावर दगडफेक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
लाखोंच्या संख्याने आलेला हा मोर्चा तहसील कार्यालयावर जाऊन धडकला

सामना ऑनलाईन। पुणे

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने पुकारेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. साताऱ्यात हिंसक जमावाने पोलिसांनाच लक्ष्य केलं असून पोलिसांच्या ताफ्यावर दगडफेक केली. यात पोलीस अधिक्षक सदीप पाटील जखमी झाले आहेत. आंदोलकांनी पुणे बंगळुरु महामार्ग रोखून धरला असून येथील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

या आंदोलनाचे लोण नगर जिल्हयात पोहचले असून येथे मनमाड रस्त्यावर कारच्या शोरुमवर आंदोलनकर्त्यांनी दगडफेक केली आहे.