‘पोस्ट हाऊस’ स्टुडिओमधील बेकायदा बांधकाम जमीनदोस्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

अंधेरी पश्चिम येथील ‘पोस्ट हाऊस’ रेकॉर्डिंग स्टुडिओमधील बेकायदा बांधकामावर पालिकेने  आज धडक कारवाई करून अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त केले. वीरा देसाई मार्गालगत सत्यदेव प्लाझा इमारतीमधील तळघरात हे बेकायदा बांधकाम करण्यात आले होते.

इमारतीच्या मान्यताप्राप्त आराखडय़ानुसार सदर जागेचा कापर ‘स्टोरेज’साठी होणे अपेक्षित होते. मात्र या ठिकाणी साऊंड रेकॉर्डिंग, ऍनिमेशन, क्हीएफएक्स, क्हिज्युअल प्रोमोज, ऑडिओ-क्हिडीओ एडिटिंग अशी कामे बेकायदेशीरपणे सुरू होती. याबाबत पालिकेच्या किभाग कार्यालयाकडून गेल्या कर्षीच नोटीस देण्यात आली होती. यानंतर संबंधितांकडून न्यायालयीन स्थगिती मिळवण्यात आली होती. मात्र आता उच्च न्यायालयाने  सदर स्थगिती उठवल्यानंतर हे अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले.

तीन हजार चौरस फुटांवर बेकायदा बांधकाम
‘पोस्ट हाऊस’ या रेकॉर्डिंग स्टुडिओत सुमारे तीन हजार चौरस फूट जागेवर बेकायदा बांधकाम सुरू होते. विशेष म्हणजे हे बेकायदा बांधकाम तळघरात करण्यात आल्याने या ठिकाणी जेसीबी, इलेक्ट्रिक कटर अशा साधनांचा वापर करणेही शक्य नव्हते. त्यामुळे हातोडा, छिन्नी, कुदळ अशा साधनांनी परिमंडळ – ४ चे उपायुक्त किरण आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.