
सामना प्रतिनिधी । गारगोटी
येथील कॅसल व्हयू अॅकॅडमी या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रत्येकाच्या जीवनात गुरूला अनन्यसाधारण महत्त्व असुन गुरूला अग्रस्थानी आणुन केलेले कोणतेही कार्य तडीस जाते. त्यासाठी प्रत्येकाने सर्व क्षेत्रात गुरु करणे अनिवार्य आहे, असे मत शिवराज बामिष्टे यांनी मांडले. ते गारगोटी येथील कॅसल व्हयू अॅकॅडमी या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
यावेळी अध्यापिका सौ. दिपाली साळोखे तसेच ज्योती पाटील यांच्यासह विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. गुरुपौर्णिमेनिमित्त घेण्यात आलेल्या हस्ताक्षर स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून विद्यार्थी व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांचे गुलाब पुष्प देऊन गौरव केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. सानिका चव्हाण हिने केले व शेवटी आभार कु. खुशी थडगे हिने मानले.
































































