सनबर्न फेस्टिव्हलचे तिकीट बुकिंग सुरू, ३१ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत बुकिंग करता येणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाई । मुंबई

२९ ते ३१ डिसेंबर रोजी पुण्यातल्या ‘द ऑक्सफोर्ड गोल्फ रिसॉर्ट’ या ठिकाणी होणार्‍या सनबर्न फेस्टिव्हलचे तिकीट बुकिंग सुरू झाले आहे. या फेस्टिव्हलची जगभरातील चाहत्यांना प्रचंड उत्सुकता असते. गेल्या ११ वर्षांपासून हिंदुस्थान आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत धुमाकूळ घालणार्‍या या फेस्टिव्हलचे बुकिंग ३१ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत करता येणार आहे. यंदाचे या महोत्सवाचे बारावे वर्ष आहे. तब्बल ४ लाख चौरस मीटरच्या परिसरात अतिशय देखण्या सेटवर हा फेस्टिव्हल दरवर्षी आयोजित केला जातो. डिसेंबर महिन्यात थंडीमध्ये आयोजित करण्यात येणार्‍या या फेस्टिव्हलमध्ये प्रत्येकजण हरवून जातो. त्यामुळे या फेस्टिव्हलने जगभरातील चाहत्यांना अक्षरशः वेड लावले आहे. www.bookmyshow.com द्वारे या फेस्टिव्हलचे बुकिंग करता येईल, अशी माहिती सनबर्न फेस्टिव्हलचे मुख्य कार्यकारी अधिकारी करण सिंग यांनी दिली.