महावितरणच्या वीज दरवाढीच्या प्रस्तावाची १ ऑगस्टपासून राज्यभर होळी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

महावितरणने वीज नियामक आयोगाकडे दाखल केलेल्या ३० हजार कोटी रुपयांच्या वीज दरवाढीच्या प्रस्तावाची १ ऑगस्टपासून राज्यभर होळी करण्यात येणार आहे. अवाच्या सवा वीज दरामुळे वीज ग्राहक आधीच मेटाकुटीस आलेले असताना महावितरणने सुमारे २२ टक्क्यांची नवी दरवाढ लादली आहे. त्याच्या निषेधार्थ दरवाढीच्या प्रस्तावाची राज्यभर होळी करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्यस्तरीय परिषदेत ग्राहकांनी एकमताने घेतला.

महाराष्ट्रातील विजेचे दर गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटकपेक्षा ३०-३५ टक्क्यांनी जास्त आहे. या वीज दरवाढीच्या निषेधार्थ आज फोर्ट येथे वीज ग्राहक व औद्येगिक संघटनांच्या समन्वय समितीने राज्यस्तरीय परिषदेचे आयेजन केले होते. यावेळी ग्राहकांनी महावितरणच्या कारभाराविरोधात संताप व्यक्त केला. त्यानुसार १ ऑगस्टपासून १४ ऑगस्टपर्यंत दरवाढ प्रस्तावाची होळी करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.