
देशात महिलांवरील बलात्कारांच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसत आहे. मंदिरातही महिला सुरक्षित नसून एका प्राचीन मंदिराच्या पुजाऱ्यानेच महिलेवर बलात्कार केल्याची घटना नोएडा येते घडली आहे.
नोएडा येथील गौतम बुद्ध नगर येथील एका प्राचीन मंदिरात पुजारी असलेल्या स्वामी कन्हैय्यानंद याच्यावर बलात्काराचा आरोप असून सध्या तो फरार आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, ती नेहमी या मंदिरात दर्शनासाठी जात असे. ९ जुलै रोजी ती आपल्या धाकट्या जावेसोबत मंदिरात गेली होती. तेव्हा कन्हैय्यानंद याने तिला आपल्या खोलीत बोलावले आणि तिच्यावर बलात्कार केला.
यानंतर पीडितेने हा प्रकार आपल्या नवऱ्याला सांगितला. नवऱ्याने तिला धीर दिला आणि तिने पोलिसात तक्रार दाखल केली. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून अद्याप तपासणी अहवाल आलेला नाही. पोलिसांनी फरार पुजाऱ्याचा शोध सुरू केला आहे.
























































