
सामना ऑनलाईन । बाली
इंडोनेशियाताली बाली बेटांना रविवारी ६.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला. या दुघर्टनेत १४ जण ठार झाले असून १६२ जण जखमी झाले आहेत. या बेटाला भूकंपाचे सलग ६० धक्के जाणवले असून या दुर्घटनेत एक हजार इमारतींचे नुकसान झाले आहे. तबाहबाली येथील लोम्बोक बेटाजवळ भूकंपाचा केंद्रबिंदू होता. संध्याकाळी ५.४५ वाजता पहिला भूकंपाचा धक्का जाणवल्यानंतर सलग ६० धक्के जाणवले. ही बेटे रिंग ऑफ फायरच्या परिसरात येत असल्याने या बेटांना भूकंप आणि ज्वालामुखीचा धोका नेहमी असतो. तसेच हे पर्यटनस्थळ असल्याने येथे नेहमीच वर्दळ असते. तसेच आज रविवार असल्याने पर्यटकांची गर्दी होती.
PMI teams mount an immediate response as a 6.4 magnitude #earthquake strikes #Lombok island. We are checking people’s needs, giving first aid and supporting search and rescue, especially in Sebalun distric, the worst affected areas. #PMISiapBantu pic.twitter.com/5ORZ1n9iwp
— Indonesian Red Cross (@palangmerah) July 29, 2018
भूकंपाची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. सुमारे साडेचार किलोमीटरच्या परिसराला भूकंपाचा सर्वाधिक फटका बसला आहे. काही इमारती कोसळल्यामुळे त्याच्या ढिगाऱ्याखाली काहीजण अडकल्याची शक्यता असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त होत आहे.



























































