
सामना ऑनलाईन। भोपाळ
मध्य प्रदेशमधील आगर जिल्हयात सात वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका भाजप नेत्यास अटक करण्यात आली आहे. नारायण माली असे त्याचे नाव आहे.
येथील पिपलॉन शहरात माली याचे किराणा मालाचे दुकान आहे. पीडित मुलीला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने माली तिला दुकानात बोलवायचा व तिच्यावर लैंगिक अत्याचार करायचा. गेल्या दोन महिन्यापासून तो पीडितेवर अत्याचार करत होता. रविवारी त्याला पोलिसांनी रंगेहात पकडले. त्याच्यावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सरकार महिलांविरोधातील गुन्हेगारी गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
काँग्रेसच्या प्रवक्त्या शोभा ओझा यांनीही सरकारला लक्ष्य केलं आहे. ‘राज्याचे गृहमंत्री भुपेंद्र सिंह काँग्रेस नेत्यांना पत्र लिहूनसुरक्षा पुरवू इच्छित असल्याचं सांगतात. विरोधकांवर टीका करण्यास त्यांना वेळ आहे, पण महिलांच्या सुरक्षेकडे गांभीर्याने पाहण्यास वेळ नाही. कठुआ आणि उन्नाव प्रकरणातही त्यांनी नेहमीआरोपींना पाठिंबा दिला आहे’, असा आरोप ओझा यांनी केला आहे.
दरम्यान, भाजपा सरकारने मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्यास सरकार बांधील असल्याचं गृहमंत्री भुपेंद्र सिंह यांनी म्हटल आहे.
summery…bjp leader rape minor arrested in madhya pradesh
























































