सानियाच्या पंक्तीत आता करमन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

टेनिसपटू करमन कौर थंडी हिला डब्ल्यूटीए रँकिंगमध्ये २०० व्या स्थानावर मुसंडी मारता आली आहे. २०० व्या रँकिंगपर्यंत पोहचणारी कमरन थंडी ही हिंदुस्थानची सहावी टेनिसपटू ठरली आहे. या आधी सानिया मिर्झा, निरूपमा वैद्यनाथन, शिखा युबेराय, सुनीत राव व अंकिता रैना यांना अशी करामत करता आली होती. करमन थंडी हिने हाँगकाँगमधील आयटीएफ एकेरी स्पर्धा जिंकत आपली वाटचाल केली आहे.