
सामना प्रतिनिधी । लातूर
लातूर जिल्ह्यात लव्ह जिहादच्या घटनांकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याने या घटनांमध्ये वाढ होत आहे. औसा तालुक्यातील मौजे याकतपूर येथील एका हिंदू महाविद्यालयीन अल्पवयीन तरुणीस पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी औसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश विश्वनाथ मोरे यांनी या प्रकरणी औसा पोलीस ठाण्यात याकतपूर तक्रार दाखल केली आहे. याकतपूर येथील मेहताब ताहेर शेख याने त्यांच्या मुलीस फूस लाऊन २५ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास पळवून नेले. या प्रकरणी पोलिसांनी मेहताब ताहेर शेख याच्याविरुध्द गुन्हा दाखल केलेला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक एस.डी.जाधव या करीत आहेत.




























































