सेरेनाचा दारुण पराभव, ५०व्या रँकिंगवरील योहाना कोण्टाने उडवला धुव्वा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । सॅन जोस

सर्वाधिक २३ ग्रॅण्डस्लॅम जिंकणाऱया अमेरिकेच्या सेरेना विल्यम्स हिला टेनिस कारकीर्दीतील सर्वात वाईट पराभवाचा सामना करावा लागलाय. ५०व्या रँकिंगवरील ग्रेट ब्रिटनच्या योहाना कोण्टा हिने सेरेना विल्यम्स हिचा ६-१, ६-० असा अवघ्या ५२ मिनिटांत धुव्वा उडवत सॅन जोस, अमेरिकेतील डब्ल्यूटीए स्पर्धेत आगेकूच केले.

सेरेना विल्यम्स हिने १९९५ साली व्यावसायिक टेनिसमध्ये पदार्पण केले. तिथपासूनच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील पराभूत झालेल्या लढतीत किमान दोन गेम जिंकण्यात तिला यश लाभले होते. पण ग्रेट ब्रिटनच्या योहाना कोण्टा हिच्यासमोर सेरेना विल्यम्स निष्प्रभ ठरली. सेरेना विल्यम्स हिने या लढतीत २५ अनफोर्स एअरर्स आणि सात दुहेरी चुका केल्या.