
सामना ऑनलाईन । लखनौ
उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे सरकार आल्यापासून राज्यातील सरकारी इमारतींना भगव्या रंगात रंगविण्याचे काम सुरू आहे. मात्र इमारतींना भगवा रंग देता देता योगी सरकारने चक्क महात्मा गांधीचा संपूर्ण पुतळाच भगव्या रंगात रंगवला आहे. शहजहापूर जिल्ह्यातील बांदा येथील हा पुतळा एका रात्रीत भगव्या रंगात रंगविण्यात आला आहे. सकाळी जेव्हा ग्रामस्थ जागे झाले तेव्हा त्यांना भगव्या रंगातील गांधीजींचा पुतळा बघून आश्चर्याचा धक्काच बसला.
A statue of Mahatma Gandhi has been painted saffron in a village in Shahjahanpur. Bacchu Singh Additional District Magistrate says,”We are investigating the matter, proper action will be taken.” pic.twitter.com/Gf3qlonotN
— ANI UP (@ANINewsUP) August 2, 2018
महात्मा गांधींचा हा पूर्णपुतळा २० वर्षांपूर्वी येथे स्थापन करण्यात आला होता. संपूर्ण पांढऱ्या रंगाचा असलेल्या या पुतळ्यात गांधीजींचा चष्मा आणि त्याची काठी काळ्या रंगाची होती. मात्र हा पुतळा पूर्णपणे भगव्या रंगात रंगविण्यात आला आहे. याप्रकरणी गावकऱ्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
summary : A statue of Mahatma Gandhi has been painted saffron in a village in uttarpradesh
























































