किकी निघाला कुकू! मधुचंद्राच्या रात्री कळलं ‘ती’ नाही, ‘तो’ आहे.

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो

सामना ऑनलाईन । मुंबई

गोवंडीमध्ये ‘एका लग्नाची विचित्र गोष्ट’ घडली आहे. हनिमूनच्या दिवशी नवऱ्याला कळले की, आपण जिच्याशी लग्न केले आहे ती ‘ती’ नसून ‘तो’ आहे. त्यामुळे सुखी संसाराची स्वप्न बघणाऱ्या ‘त्याला’ आता हताश होऊन पोलीस ठाण्याचे उंबरे झिजवण्याची वेळ आली आहे.

गोष्ट आहे गोवंडीच्या २१ वर्षीय यामीन सैयद याच्या लग्नाची. यामीनची त्याच्याच कॉलेजमधल्या एका तरुणीसोबत मैत्री झाली होती. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानूसार दोघांच्याही कुटुंबीयांच्या संमतीने यामीनचे आणि आयशा खानचे लग्न झालं.

लग्नानंतर ज्या क्षणाची नवदांपत्य वाट बघत असते, तसाच यामीन देखील मधुचंद्र साजरा करण्यासाठी आसुसला होता. लग्नानंतर मधुचंद्र साजरा करण्यासाठी यामीन आणि आयशा थेट कुलु-मनालीला गेले. मात्र मधुचंद्राच्या रात्री उघड झालेल्या गोष्टीमुळे यामीनच्या पायाखालची जमीन सरकली.

यामीन जेव्हा आयशाच्या जवळ गेला आणि तिला प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करू लागला. त्यावेळी आयशा वेगवेगळी कारणं देत त्याच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत होती. शरीरसंबंध ठेवण्यास ती त्याला टाळत होती. एवढं करूनही यामीन बधत नाही असं पाहून जे सत्य आयशाने लपवलं होतं ते उघड झाले. कारण आयशा ‘ती’ नव्हती तर ‘तो’ होता. एवढेच नाही तर आयशाने व्हर्जिनोप्लास्टी झाल्याचेही मान्य केले.

घडलेल्या प्रकारामुळे यामीनला जबरदस्त धक्का बसला, कसाबसा तो परत घरी आला. आता हा प्रकार घरच्यांना सांगायचा तरी कसा, या चिंतेमुळे तो नैराश्यात गेला होता. अखेर काही दिवसांपूर्वी त्याच्या भावनांचा उद्रेक झाला आणि त्याने घडलेली सर्व हकिकत कुटुंबीयांना सांगत आयशाच्या घरच्यांना याचा जाब विचारला. आयशाच्या कुटुंबीयांनी मात्र उडवाउडवीची उत्तर देत उलट यामीनलाच धमकावण्याचा प्रयत्न केला. मात्र यामीन ऐकत नसल्याचे पाहून त्यांनी घटस्फोटाची मागणी केली. यामीनने घटस्फोट देण्याला विरोध केला असून घटस्फोट महिलेला दिला जातो आणि मी महिला समजून जिच्याशी लग्न केलं आहे, ती महिला नाहीच. त्यामुळे घटस्फोट देण्याचा प्रश्न येत नाही, असं स्पष्ट करत आयशा आणि तिच्या कुटुंबीयांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या अजब प्रकरणामुळे शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पोलिसांचं डोकं मात्र चांगलंच भंडावलं आहे.