
सामना प्रतिनिधी, जयसिंगपूर
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून जयसिंगपूर येथील क्रांती चौकात मराठा समाजबांधवांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. शिरोळ तालुका मराठा मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत नलवडे यांच्याहस्ते क्रांती चौकातील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून धरणे आंदोलनाची सुरुवात झाली.
मराठा आरक्षण आंदोलनाची धग आता वाढली असून गावागावांत मराठा बांधव रस्त्यावर उतरले आहेत. नुकतीच शिरोळ तालुक्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोटारसायकल रॅली काढण्यात आली होती. आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून आजपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. यावेळी नगरसेवक सर्जेराव पवार, बजरंग खामकर, माजी नगरसेवक चंद्रकांत जाधव, संजय चव्हाण, अशोक कराळे, सुभाष जाधव, आदम मुजावर, इकबाल सुदरने, स्वप्नील आवळेकर, संजय जाधव, शिवाजी केकले, विशाल पवार, अभिजीत भांदिगरे, अशोक पाटील, अनिल वाठारकर, प्रणव पवार, अजित पवार, संदीप बेलवडेकर, आनंद चौगुले, ओंकार बेंदरे, जगन्नाथ लिगाडे, तानाजी जाधव, नयनसिंह पवार, महेश जगदाळे, संतोष जाधव, अमर पाटील आदी उपस्थित होते.




























































