काजोलच्या नव्या चित्रपटाचा ट्रेलर लाँच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

२०१५ला ‘दिलवाले’ या चित्रपटात झळकल्यानंतर काजोल एकाही चित्रपटात दिसली नाही. त्यामुळे काजोलच्या चाहते तिच्या कमबॅकची आतुरतेने वाट पाहत होते. या चाहत्यांची प्रतिक्षा आता संपली असून काजोलच्या नव्या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे. काजोलचा आगामी चित्रपट हेलिकॉप्टर इलाचा ट्रेलर आज तिच्या वाढदिवशी लाँज केला असून या चित्रपटातील काजोलच्या धमाकेदार अभिनयाची सोशल मीडियावर तारिफ होत आहे.

या चित्रपटात काजोल ही एका कॉलेजला जाणाऱ्या तरुणाची आई दाखवली आहे. ती सिंगल मदर असून पुढील शिक्षणासाठी ती मुलासोबतच त्याच्या कॉलेजमध्ये अॅडमिशन घेते. त्यानंतर कॉलेजमधील काजोलची मस्ती, त्यामुळे तिच्या मुलात व तिच्यात आलेला दुरावा हे या चित्रपटात दाखविण्यात आले आहे. या चित्रपटात काजोलच्या मुलाची भूमिकात राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता रिद्धी सेन याने केली आहे.