स्वित्झर्लंडमध्ये विमान कोसळून २० जण ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । जिनेव्हा

स्वित्झर्लंडमधील पिज सेग्नाज पर्वतरांगांमध्ये शनिवारी दुपारी विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेत २० जण ठार झाले आहेत.  अपघातग्रस्त विमान दुसऱ्या महायुद्धाचा काळात १९३९ मध्ये जर्मनीत बनवण्यात आले असून जॉन्कर जे यू ५२ एच बी हॉट नावाचे होते. सध्या हे विमान स्विस हवाई दलाच्या जे यू कंपनीकडे होते. या विमानात १७ प्रवासी आणि ३ कर्मचारी होते. त्या सर्वांचा अपघातात मृत्यू झाला.मृतांमध्ये एका दाम्पत्य आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे.

शनिवारी सकाळी १० वाजता विमानाने ज्युरिकजवळील ड्युबेलड्रॉफ येथील लष्करी तळावर जाण्यासाठी दक्षिण स्वित्झर्लंडच्या टिकिनोहून उड्डाण केले होते.पिज पर्वतरांगांमध्ये आल्यावर विमान १८० अंशामध्ये फिरले आणि अचानक कोसळल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. विमान कोसळल्यानंतर त्याचा स्फोट झाला. घटनास्थळी बचावकार्यासाठी पाच हेलिकॉप्टर पाठवण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

दुर्घटनेबाबतच जे यू कंपनीने दुःख व्यक्त केले असून कंपनीची सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. १९३९ मध्ये बनवण्यात आलेली सर्व जॉन्कर विमाने भाड्याने चालवण्यात येत असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. ही विमाने लष्कराचे माजी अधिकारी किंवा कुशल वैमानिकच चालवतात. निडवाल येथील जंगलात नुकतेच स्विस कंपनीचे विमान दुर्घनाग्रस्त झाले होते.