फुलकावणी! सिंधूचे जगज्जेतेपद दुसऱ्यांदा हुकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
DHDHHJIUH

सामना ऑनलाईन । नानजिंग (चीन)

हिंदुस्थानची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूला पुन्हा एकदा जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत जेतेपदाने हुलकावणी दिली. किताबी लढतीत स्पेनच्या कॅरोलिना मरीनने सिंधूला २१-१९, २१-१० असे सरळ गेममध्ये पराभूत करून विजेतेपदाला गवसणी घातली. जागतिक बॅडमिंटन स्पर्धा तिसऱ्यांदा जिंकणारी मरीन ही पहिलाच बॅडमिंटनपटू ठरली हे विशेष.