साडेआठ लाख विद्यार्थ्यांपैकी ३० हजार ३५२ जणांना शिष्यवृत्ती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या दोन्ही परीक्षांना बसलेल्या एकूण ८ लाख ३१ हजार ४५८ विद्यार्थ्यांपैकी ३० हजार ३५२ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे. निकालाची टक्केवारी १८.४८ इतकी आहे.

परीक्षांचा सविस्तर निकाल राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in DeeefCe http://puppss. mscescholarshipexam.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे. या परीक्षांचा निकाल २१ जून रोजी जाहीर करण्यात आला होता. निकालानंतर गुणपडताळणीसाठी आलेल्या अर्जांची छाननी केल्यानंतर आज सोमवारी अंतिम निकाल जाहीर करण्यात आला असल्याचे परीक्षा परिषद आयुक्त सुखदेव डेरे यांनी सांगितले.

पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा
एकूण विद्यार्थी – ४७२६१०,
पात्र – १०८५६०.
शिष्यवृत्ती पात्र – १६५९३,
शेकडा निकाल – २२.९७ टक्के.

आठवी शिष्यवृत्ती परीक्षा
एकूण विद्यार्थी – ३५८८४८,
पात्र – ४५१०३.
शिष्यवृत्ती पात्र – १३७५९,
शेकडा निकाल – १२.५७ टक्के.