परभणीत राज्यसरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे कामकाज ठप्प

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। परभणी

परभणीत राज्यसरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे कामकाज ठप्प झाले आहे. सातवा वेतन आयोग लागू करावा यासह अनेक प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून तीन दिवसीय संप पुकारला आहे. या संपास परभणी जिल्ह्यातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचाही पाठींबा आहे. यामुळे शासकीय कामकाज पूर्णत: ठप्प झाले आहे.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग तात्काळ लागू करण्यात यावा, जूनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, पाच दिवसाचा आठवडा करण्यात यावा, सेवानिवृत्तीचे वय ६० वर्ष करण्यात यावे आदी प्रमुख मागण्यांसाठी तीन दिवस संपावर जाण्याचा निर्णय घेतला असून राज्य सरकारी, निमशासकीय, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी प्रलंबित मागण्यासाठी या संपात उतरले आहेत.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी विविध सात मागण्या केला असून या मागण्या गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबित आहेत. या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. तसेच जिल्हा परिषद कर्मचारी युनियनही त्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ७ ऑगस्ट रोजी लाक्षणिक संपावर गेले आहेत. या संपास जिल्हाभरात चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचा दावा संघटनेचे अध्यक्ष नागनाथ कापसे, कार्याध्यक्ष गजानन लोंढे, सचिव नामदेव गुंडरे यांनी केला आहे.

summary…state govt employee strike hit in parbhani