कुत्रा आडवा आल्याने दुचाकी घसरली; चिमुकल्याचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

दुचाकीने पत्नीसोबत रत्नपूरला जात असताना पडेगाव रोडवर अचानक कुत्रा आडवा आल्याने दुचाकी घसरली. यात दोनवर्षीय मुलाचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या घटनेत घरात खेळताना अचानक विषबाधित वस्तू खाल्ल्याने तीनवर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बायजीपुरा येथील शेख तौफिक हे सोमवारी सकाळी पत्नी व दोन वर्षांचा मुलगा शेख ताहूरसोबत दुचाकीने रत्नपूरला जात असताना पडेगाव रोडवर अचानक कुत्रा आडवा  आल्याने दुचाकी घसरली. यात शेख तौफिक व त्यांची पत्नी आणि मुलगा ताहूर हा दूरवर फेकला गेला. पती-पत्नी किरकोळ जखमी झाले तर ताहूरच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याने त्यास क्रांतीचौक येथील निरामय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना ताहूर याचा मृत्यू झाला. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तसेच किराडपुरा, रहिमनगरातील नसीब खान पठाण यांची तीनवर्षीय चिमुकली मशिरा खान ही रविवारी सायंकाळी घरात खेळत असताना तिने काही तरी विषबाधित पदार्थ तोंडात घातला. उपचारासाठी तिला घाटीत दाखल केले असता उपचार सुरू असताना मशिरा खान हिचा मृत्यू झाला. या प्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.