हे आहेत देशातील बेस्ट अॅम्युझमेंट पार्क

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। मुंबई

जर तुम्हांला साहसी खेळांची आवड असेल. परदेशातील अॅम्युझमेंट पार्कमधील राईड्सचा आनंद तुम्हांला घ्यायचा असेल. तर ही बातमी नक्की वाचा. कारण परदेशातील राईड्सचा थरार तुम्हाला येथेही घेता येईल अशी ५ अॅम्युझमेंट पार्कस आपल्या देशातही आहेत.

esselworld

एस्सेल वर्ल्ड, मुंबई

एस्सेल वर्ल्ड हे देशातील पहिले अॅम्युझमेंट पार्क आहे. जगातील सर्वात जुन्या व सर्वात मोठ्या वॉटर पार्कमध्ये एस्सेल वर्ल्डचा समावेश होतो. ४२ एकर जागेवर उभारलेल्या एस्सेल वर्ल्डमध्ये खेळण्याचा आनंद लहान मुलचं नाही तर मोठी माणसंही आनंदाने घेतात. थरारक खेळांबरोबर अफलातून पाण्यातील राईड्स हे एस्सेल वर्ल्डचं वैशिष्ट आहे. शाळा, कॉलेजच्या सहलींबरोबरच कौटुंबिक सहलीसाठी येथे मोठी गर्दी असते.

ramoji-city

रामोजी सिटी, हैदराबाद

जगातील सर्वात मोठी फिल्म सिटी म्हणजे चित्रपट नगरीं म्हणून रामोजी सिटी ओळखली जाते. २००० एकरमध्ये पसरलेले हे थीम पार्क १९९६ साली उभारण्यात आले. दरवर्षी लाखो पर्यटक रामोजी सिटी पाहण्यासाठी हैदराबादला येतात. येथे ५० शुटींग फ्लोर असून शुटींगसाठी ५०० हून अधिक सेट तयार करण्यात आले आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कल्पकतेने करुन ही सिटी उभारण्यात आली आहे. यामुळे बॉलिवू़ड पासून हॉलिवूडपर्यंत सर्वच चित्रपटांची येथे शूटींग होते. त्याशिवाय खासगी कार्यक्रम,सहली, चर्चासत्रही येथे होतात.

wonderela-benaluru

वंडरेला अॅम्युझमेंट पार्क , बंगळुरु

८२ एकर जागेवर हे पार्क उभारण्यात आले आहे. ६० हून अधिक विविध प्रकारच्या राईड्स येथे आहेत.त्याशिवाय लेझर शो,वर्च्युअल रिएलिटी शो, देशातील सर्वात मोठे म्युझिकल फाऊंटन शो देखील येथे आहे. दररोज शेकडो पर्यटक येथे फिरण्यासाठी येतात.

kochhi

अॅम्युझमेंट पार्क ,कोच्ची

केरळमधील कोच्चीतील अॅम्युझमेंट पार्क प्रसिद्ध आहे ते येथील साहसी वॉटर स्लाईडस, रोलर कोस्टर आणि वेगवेगळ्या थरारक राईड्ससाठी. ३५ एकर मध्ये ५६ थरारक राईड्स तयार करण्यात आल्या आहेत.

science-kolkata

सायन्स सिटी, कोलकाता

१९९७ साली हे पार्क उभारण्यात आले. जगातील मोठ्या सायन्स म्युझियममध्ये सायन्स सिटीचा समावेश होतो. मनोरंजनाबरोबरच येथे खूप काही शिकायला मिळत. डायनासोरबदद्ल अधिक माहिती जाणून घेण्यास तुम्ही उत्सुक असाल तर कोलकातामधील या सायन्स सिटीला नक्की भेट द्या.