कुठे दाखवली अमित शहांना ‘भाजप चले जाओ’ ची पोस्टर , वाचा सविस्तर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । कोलकाता

आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपने आतापासूनच तयारी सुरु केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा विविध राज्यांचा दौरा करत आहेत.आता अमित शहांचे लक्ष ममता बॅनर्जी यांचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम बंगालकडे आहे. शहा शनिवारी कोलकातामध्ये एका सभेला संबोधीत करणार आहेत. मात्र, या रॅलीपुर्वीच कोलकातातील मेयो रोडवर ‘ बंगाल-विरोधी भाजप वापस जाओ’ असे फलक झळकले होते. त्यामुळे शहा यांच्या दौऱ्यापुर्वीच पश्चिम बंगालमध्ये पोस्टरवॉर सुरू झाले आहे. या पोस्टरवॉरच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि मुख्य सचिवांना पत्र लिहून शहा यांच्या रॅलीला योग्य ती सुरक्षाव्यवस्था पुरवण्याची मागणी भाजपने केली आहे.

तृणमूल काँग्रेस शनिवारी राष्ट्रीय नागरिक नोंदणीविरोधात रॅली काढणार आहे. भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला करण्यासाठीच तृणमूल काँग्रेसने शहा यांच्या दौऱ्याच्या दिवशीच रॅली आयोजित केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे अमित शहाचा दौरा आणि ममता यांची रॅली यातून दोन्ही पक्ष शक्तीप्रदर्शन करणार आहेत. एनआरसीच्या मुद्द्यावरून पश्चिम बंगालमध्ये भाजपविरोधी वातावरण आहे. त्यामुळे शहा यांना त्यांच्या दौऱ्यात स्थानिकांच्या रोषाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.