
सामना ऑनालाईन । नवी दिल्ली
गेल्या दोन वर्षात संपूर्ण देशात २३७ वाघांचा मृत्यू झाला आहे. सरकारने गुरुवारी लोकसभेत ही माहिती सादर केली. २०१२ ते २०१७ या काळात बेकायदेशीर शिकारीमुळे २३ टक्के तर ५५ टक्के नैसर्गिक कारणांमुळे वाघांचा मृत्यू ओढवला आहे.
पर्यावरण मंत्री महेश शर्मा म्हणाले की “७ टक्के वाघांचा मृत्यू हे अनैसर्गिक असले तरी त्यांचा मृत्यू बेकायदेशीर शिकारीमुळे झाला नाही, तर ट्रॅफिक अपघात किंवा मानवी व वन्यजीवन संघर्षामुळे ओढवले आहेत. बाकी १६ टक्के वाघांचे मृत्यूचे कारण कळाले नाही.” अधिकार्यांना फक्त वाघांचे मृतदेह आढळल्याने या प्रकरणांना वेगळ्या श्रेणीत ठेवल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

























































