
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
देशात घुसखोरी करणाऱ्या बेकायदा निर्वासितांवर नियंत्रण आणण्यासाठी राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) हे महत्वाचे पाऊल आहे. अशा निर्वासितांना देशाबाहेर काढायलाच हवे. अन्यथा देशात कश्मीरसारख्या १० समस्या उभ्या ठाकतील. असे परखड मत योगगुरू रामदेवबाबा यांनी मांडले आहे. रोहिंग्या घुसखोरांची समस्या सोडवली नाही तर देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो अशी भीती व्यक्त करत रामदेव यांनी एनआरसीला आपला ठाम पाठिंबा असल्याचे एका कार्यक्रमात बोलताना सांगितले.
3-4 crore log Bharat mein avaidh tareeke se rehte hain, ismein Rohingya upar se aur aa gaye, jinko galat tareeke se training di gai hai, vo yahan par bas gaye toh yahan 10 Kashmir aur tayar ho jayenge: Baba Ramdev on #NRC (10.08.18) pic.twitter.com/YllAm1qCOn
— ANI (@ANI) August 11, 2018
देशात चार कोटी बेकायदा निर्वासित वास्तव्य करत असल्याचा दावा करीत रामदेवबाबा म्हणाले, “बेकायदा निर्वासित नेहमी समस्याच उभ्या करतात मग ते पाकिस्तानी असोत बांगलादेशी, रोहिंग्या किंवा अमेरिकन. आधीच आपल्याला एक कश्मीर हाताळणं कठीण जात आहे. त्यात जर रोहिंग्यांना राहण्याची परवानगी दिली तर ते कश्मीरसारख्या अजून १० समस्या उभ्या करतील”.
तसेच “समाजातील विशिष्ट वर्गाला आजही आरक्षणाची गरज आहे. मात्र ज्यांना गरज नाही त्यांचा त्यात समावेश केला जाऊ नये. मागास वर्गात आरक्षण कोणाला मिळावे हे निश्चित करण्यासाठी प्रभावी कायदा करण्याची गरज आहे ” असेही योगगुरू रामदेव बाबा यांनी सांगितले.



























































