दारू पिताना मित्राने केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनीधी । मुंबई

मानखुर्द येथे दारू प्यायला बसलेल्या दोघा मित्रांमध्ये टोकाचा वाद होऊन त्यात एकाला मात्र जीव गमवावा लागला. दारू पिताना झालेल्या भांडणाच्या रागातून मित्र व त्याच्या प्रेयसीने केलेल्या जबर मारहाणीत बकरुद्दीन खान याचा मृत्यू झाल्याची घटना आज घडली.

मानखुर्दच्या पीएमजीपी कॉलनीतील ‘साईकृपा’ एसआरए गृहनिर्माण संस्था इमारत क्रमांक ११० च्या तळमजल्यावर आज काही जण दारू पीत बसले होते. त्यावेळी बकरुद्दीन दारूच्या नशेत मुरगन याच्या प्रेयसीला उद्देशून अश्लील भाषेत बोलला. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला. वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. यावेळी सर्वांनी केलेल्या मारहाणीत बकरुद्दीन खान (४६) याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मानखुर्द पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱयांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.