
सामना प्रतिनिधी। उरण
उरण परिसरातील जेएनपीटी बंदरावरील खाड्या, जलाशये आणि पाणथळ जागांवर आता आकर्षक गुलाबी रंगाचे फ्लेमिंगोंचे थवे दिसू लागले आहेत. त्यामुळे काळ्या चिखलानी भरलेला खाडी परिसर गुलाबी बनला आहे.

उरण परिसरात विर्स्तीर्ण जलाशय, खाड्या आणि पाणथळ जागी स्थलांतरीत दुर्मिळ जलचर पक्षांची नेहमीच गर्दी असते. जलाशय, खाडयात शेवाळ, प्रवाळ, खुबे, छोटे-मोठे मासे, कृमी-किटक,शंख-शिंपले विपुल प्रमाणात आढळतात. यामुळे दरवर्षी लाखो स्थलांतरीत आणि जलचर पक्षी येथे आणि उरण परिसरात मोठ्या संख्येने येत असतात. यामध्ये प्रामुख्याने फ्लेमिंगो, पेलिकन, करकोचा, माळढोक आणि इतर अनेक जातींच्या जलचर पक्षांचा समावेश असतो.विर्स्तीर्ण जलाशये, खाड्या,पाणथळ जागांवर विविध जलचर दुर्मिळ पक्षांची होणारी गर्दी आणि त्यांच्या विलोभनीय हालचाली टिपण्यासाठी पक्षी प्रेमींची नेहमीच उरण परिसरातील विविध ठिकाणी रेलचेल असते.

स्थलांतरीत जलचर पक्षांसाठी आणि विशेषता फ्लेमिंगोसाठी असलेली वास्तव्याची ठिकाणं नष्ट झाली आहेत. त्यामुळे एकमेव उरलेल्या डोंगरी-पाणजे खाडीत फ्लेमिंगो पक्षांनी आता डेरा टाकला आहे .या विस्तीर्ण खाडीत काळ्या चिखलावर ओहटीच्यावेळी लाखोंच्या संख्येने फ्लेमिगों पक्षी उतरले आहेत. त्यामुळे काळ्या चिखलानी भरलेला खाडी परिसर गुलाबी छटांनी उजळून निघाला आहे. हे विलोभनीय दृश्य पाहाण्यासाठी पक्षीप्रेमींची चांगलीच गर्दी उसळली आहे.तसेच जासई-दास्तान फाटाजवळील जलाशय,जेएनपीटी-जासई रेड दरम्यानच्या पाणथळी जागांवरही फ्लेमिंगोचे दर्शन होऊ लागले आहे. एरव्ही पावसाळा सुरु होताच फ्लेमिंगो स्वदेशी माघारी परततात. मात्र यावर्षी पावसाळ्यातच फ्लेमिंगोंचे उरण परिसरात आगमन झाल्याने पक्षीप्रेमीही सुखावले आहेत.
summary…flammiungo will seen in uran ,jnpt



























































