हिंदुस्थानच्या पहिल्या ऑलिम्पिक सुवर्णपदक प्राप्तीला 70 वर्षे पूर्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त झालेले हिंदुस्थानवासी देशाच्या पहिल्या स्वातंत्रदिनाची तयारी करत असतानाच हिंदुस्थानी हॉकी संघाने 12 ऑगस्ट 1948 रोजी गोऱ्या इंग्रजांचा माज उतरवत त्यांच्या हॉकी संघाला 4-0 असे पराभूत केले आणि ऑलिम्पिकचे पहिले सुवर्णपदक पटकावण्याचा पराक्रम केला. या भीमपराक्रमाला आज 70 वर्षे पूर्ण झाली. ज्या इंग्रजांनी आपल्यावर अनेक वर्षे राज्य केले त्यांनाच आपल्या हॉकीपटूंनी वेम्ब्ले स्टेडियमवर अंतिम लढतीत पराभूत करून तिरंग्याची शान वाढवली. त्यानंतर तीनच दिवसांनी हिंदुस्थानने आपला दुसरा स्वातंत्रदिन मोठय़ा उत्साहात साजरा केला. या लढतीचे हीरो बलबीरसिंग आता 93 वर्षांचे आहेत. त्यांनी 71 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्ताने आपल्या कारकीर्दीतील सोनेरी आठवणींना उजाळा देताना हा इतिहास सांगितला.

लंडन ऑलिम्पिकमध्ये हॉकीत यजमान इंग्लंडला पराभूत करून आम्ही देशवासीयांना स्वातंत्र्यदिनाची आगळी भेट दिली असे सांगताना वयोवृद्ध बलबीर यांचा ऊर अभिमानाने भरून आला होता.