उमर खालिदवर गोळीबाराचा प्रयत्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

राजधानीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा विद्यार्थी नेता उमर खालिद याच्यावर आज दुपारी संसद भवनानजीक अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. मात्र त्या गोळीबारातून तो थोडक्यात बचावला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून एक पिस्तूल ताब्यात घेतले आहे. दरम्यान, देशात प्रचंड भीतीचे वातावरण सध्या आहे. मोदी सरकारविरोधात जो बोलेल, त्याला धमकावले जात आहे. धाकदपटशा सुरू आहे, असे उमर खालिद याने गोळीबारानंतर बोलताना सांगितले.