
सामना प्रतिनिधी । नगर
जाती, धर्मांना जोडण्याचे काम बसपा करीत आहे. भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून संविधान धोक्यात आले आहे. कायदे पायदळी तुडवून धर्मांध शक्तींना प्रोत्साहन देण्याचे काम देशात चालू आहे. मागासलेल्या सर्व जाती, धर्म व जमातींना बरोबर घेऊन विकासाच्या प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने बसपा कटिबध्द राहून कार्य करीत आहे. जातीय व्यवस्था नष्ट करण्यासाठी अल्पसंख्यांक समाजाला बसपाच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन महाराष्ट्र प्रदेश प्रभारी प्रमोद रैना यांनी केले.
टिळक रोड येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात आयोजित बहुजन समाज पार्टीच्या संविधान बचाव जिल्हाव्यापी मेळाव्यात मार्गदर्शन करताना रैना बोलत होते. या मेळाव्यात सामाजिक एकतेचा संदेश देत जातीय शक्तींचा विरोध करण्यासाठी सर्व बहुजनांना एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले. तर संपुर्ण जिल्ह्यात गावागावात सेक्टर बुथ स्थापन क रण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे, संजीव सदाफुले, प्रदेश महासचिव किरण आल्हाट, जिल्हाध्यक्ष उमाशंकर यादव, जिल्हा प्रभारी संजय डहाणे, सचिन गवांदे, सुनिल ओव्हळ, मेजर राजू शिंदे, सचिन घोडके, अण्णासाहेब दहातोंडे, बाळकृष्ण काकडे, अनिल ओव्हळ, माधवराव त्रिभुवन, अनिल जाधव, बाळासाहेब मधे, अॅड.प्रकाश संसारे, मीराताई शिंदे, किशोर शिंदे, जीवा घोडके, सुरज घोडके, प्रविण लोखंडे, प्रकाश भालेराव, चाँद शेख, सरपंच अब्बास शेख, राजेंद्र साळवे, विलास गीरे, पप्पूसिंग राजपूत, शंकर भैलुमे, प्रविण मगर, गणेश बागल, सुभाष यादव आदींसह जिल्हा विधानसभेचे अध्यक्ष व जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविकात जिल्हाध्यक्ष उमाशंकर यादव यांनी मेळाव्याचे उद्दीष्ट स्पष्ट करुन जिल्ह्यात चालू असलेल्या कार्याचा आढावा घेतला. पाहुण्याचे स्वागत शहर व विधानसभा क मिटीच्या वतीने करण्यात आले. या मेळाव्यात आदिवासी, एकलव्य, चर्मकार व मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने प्रवेश केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अनिल तांबे यांनी केले. आभार सुनिल मगर यांनी मानले. मेळावा यशस्वी करण्यासाठी संतोष जाधव, विजय गायकवाड, जितेंद्र साठे, नितीन भालेराव, नितीन बोबडे, सचिन जगताप आदिंसह जिल्हा बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.


























































