‘गंदी लडकी’ म्हणाऱ्याला भावाने जाब विचारला, झाला जीवघेणा हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

इंस्टाग्रावर बहिणीच्या फोटोवर अश्लील कमेंट केल्याचा जाब विचारायला गेलेल्या एका तरुणावर त्याच्या इंस्टाग्राम फॉलोअरने जीवघेणा हल्ला केल्याची घटना वरळी येथे घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मोहीउद्दीन शेख या तरुणाला अटक केली आहे. मोहीउद्दीनने इम्रान खान (१८) या तरुणावर चाकूने वार केले आहेत. सुदैवाने इम्रान या हल्ल्यातून बचावला आहे.

इम्रान खानने त्याच्या बहिणीचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला होता. त्या फोटोवर मोहीउद्दीनने कमेंट करत एक स्मायली इमोजी पाठवली होती. त्यावर इम्रानने मोईउद्दीनला असे का पाठवले असा जाब विचारला. त्यावर मोहीउद्दीनने इम्रानला असा बालिशपणा थांबव आणि अधिक काही बोलायचे असेल तर मला फोन कर असे सुनावले. त्यानंतर इम्रानने त्याला फोन करून भायखळा येथे भेटायला बोलावले. जेव्हा हे दोघे भेटले त्यावेळी त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर मोहीउद्दीनने तेथील वडापावच्या गाडीवरील चाकूने इम्रानवर वार केले. आजूबाजूच्या लोकांनी त्या दोघांना अडवले, त्यामुळे इम्रान बचावला. त्यानंतर लोकांनी मोहीउद्दीनला पोलिसांच्या ताब्यात दिले.

याप्रकरणाच्या चौकशी दरम्यान शेख हा त्याच्या बहिणीविषयी अश्लील शेरेबाजी करत असल्याचे इम्रानने पोलिसांना सांगितले. तसेच त्याने आपल्या बहिणीला ‘गंदी लडकी’ म्हटल्याचे सांगत त्याने तक्रार दाखल केली.

summary : two youths fight over instagram comment