
सामना ऑनलाईन । मुंबई
हिंदुस्थानचे माजी क्रिकेटपटू आणि कर्णधार अजित वाडेकर यांचे दिर्घ आजाराने निधन झाले आहे. मुंबईतल्या जसलोक रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्यू समयी ते 77 वर्षाचे होते.
Former Indian test captain Ajit Wadekar passes away at 77 in Mumbai’s Jaslok Hospital. pic.twitter.com/pUq0QzrNfo
— ANI (@ANI) August 15, 2018
वाडेकर यांचा जन्म 1 एप्रिल 1941 मध्ये मुंबईत झाला होता. 13 डिसेंबर 1966 ला वाडेकर यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध आपला कसोटी क्रिकेटचा शुभारंभ केला होता. कसोटीत 37 सामन्यात त्यांच्या नावावर 2113 धावांची नोंद आहे. यात 14 अर्धशतक आणि एका शतकाचा समावेश आहे. कसोटीत 143 ही त्यांची सर्वोच धावसंख्या आहे. त्यानंतर 8 वर्षांनी त्यांनी 13 जुलै 1974 ला इंग्लंडविरुद्ध पहिला एक दिवसीय सामना खेळला. आपल्या संपूर्ण क्रिकेट कारकिर्दीत त्यांनी फक्त दोन एक दिवसीय सामने खेळले. यात त्यांच्या नावावर एका अर्धशतकासह 73 धावांची नोंद आहे.
वाडेकर यांच्या कर्णधारपदाखाली हिंदुस्थानने 1971 साली वेस्ट इंडिज आणि इंग्लंड दौऱ्यात कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम गाजवला होता. विदेशात विजयाची सवय लावून देणारा कर्णधार अशी वाडेकर यांची ओळख होती.
So many memories of Ajit Wadekar. None more powerful than leading India to series wins in 1971 in England and the West Indies. Much admired, much loved. Page in Indian cricket and in our memories.
— Harsha Bhogle (@bhogleharsha) August 15, 2018
My heartfelt condolences to Former cricketer Ajit Wadekar.may his soul rest in peace.
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) August 15, 2018

























































