
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
व्हॉट्स अॅपला टक्कर देण्यासाठी योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली समूहाचे स्वदेशी ‘किंभो अॅप’ 27 ऑगस्टला पुन्हा बाजारात येणार आहे. पतंजलीचे सहसंस्थापक आचार्य बालकृष्ण यांनी आज ट्विटरद्वारे याची माहिती दिली.
T-1
स्वतंत्रता दिवस की हार्दिक शुभकामनाएं
आप के विश्वास के लिए पतंजलि परिवार आपके प्रति कृतज्ञ है,आप स्वतंत्रता दिवस के पावन उत्सव के साथ डिजिटल आजादी का जश्न “किम्भो:” के नये और एडवांस फीचर्स के साथ मनाइये| किम्भो: ऐैप में कुछ सूक्ष्म न्यूनताएँ हो सकती है, उनके continues in T-2 pic.twitter.com/bWLk6x6x3Q— Acharya Balkrishna (@Ach_Balkrishna) August 15, 2018
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत या ऍपचे लाँचिंग होणार आहे. ‘किंभो अॅप’ या आधी मे महिन्यात लाँच केले होते, मात्र युजर्सना आलेल्या अडचणींमुळे ते प्ले स्टोअरमधून हटवण्यात आले. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काही सुधारणा करून हे स्वदेशी ऍप पुन्हा हिंदुस्थानींसाठी अवतरणार आहे.
























































