LIVE- अटल बिहारी वाजपेयी यांचे निधन, शुक्रवारी अंत्यसंस्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

  • उद्या दुपारी चार वाजता शासकीय इतमामात राष्ट्रीय स्मृती स्थळी अटलजींवर होणार अंतिम संस्कार
  • उद्या सकाळी 9 वाजता अटलजींचे पार्थिव भाजप मुख्यालयात ठेवण्यात येणार
  • अटलजींचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी दर्शनासाठी ठेवण्यात आले, दर्शनासाठी नेत्यांची रांग

  • अटलजी गेले आणि मी माझ्या वडिलांना गमावले – मोदी

  • हिंदुस्थानने अनमोल रत्न गमावले आहे – पंतप्रधान मोदी

  • अटलजींच्या जाण्याने भाजपात एक पोकळी निर्माण झाली, ती कधीही भरून येणार नाही – शहा
  • हिंदुस्थानी राजकारणाच्या आकाशातील अटल ध्रुवतारा निखळला – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा
  • अटल बिहारी वाजपेयींचे अंत्यसंस्कार स्मृती स्थळ येथे होणार
  • दिल्लीतील सरकारी कार्यालये उद्या अर्धा दिवस सुरू राहणार

  • अटल बिहारी वाजपेयींचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आणले

  • मध्य प्रदेशमध्ये सात दिवसांचा दुखवटा, उद्या सुट्टी जाहीर

  • झारखंडमध्ये सात दिवसांचा दुखवटा जाहीर, उद्या सर्व राज्यभरात सुट्टी जाहीर

  • पंजाबमध्ये तीन दिवसांचा दुखवटा जाहीर, उद्या शाळा, महाविद्यालय, सरकारी कार्यालये बंद राहणार

  • अटलजींच्या निधनानंतर बिहारमध्ये 7 दिवसांची सार्वजनिक सुट्टी जाहीर

  • हिंदुस्थानातील अमेरिकेच्या दुतावासानेही वाहिली अटलजींना श्रद्धांजली

  • अटलजींच्या तोडीचे नेतृत्व भाजप सरकारमध्ये यापुढे सापडणार नाही – शिवसेना नेते, खासदार संजय राऊत
  • अटलजींच्या निधनानंतर सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

  • उद्या दुपारी दीड वाजता भाजपच्या मुख्यालयातून वाजपेयी यांची अंतयात्रा निघणार
  • अटलजींवर शुक्रवारी अंत्यसंस्कार होणार
  • सायंकाळी साडे सहा वाजता कॅबिनेटची बैठक

  • भाजप मुख्यालयात अटजींचे पार्थिव दर्शनासाठी ठेवण्य़ात येणार
  • सायंकाळी साडे सातच्या सुमारास अटलजींचे पार्थिव त्यांच्या घरी नेण्यात येणार

  • भाजप मुख्यालयावरील भाजपचा झेंडा अर्ध्यावर आणण्यात आला
  • अटल बिहारी वाजपेयी यांचे निधन

  • छत्तीसगढचे मुख्यमंत्री रमण सिंह एम्समध्ये पोहोचले

  • मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान एम्स रुग्णालयात दाखल

  • बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री सुशील मोदी आणि मंत्री नंदकिशोर एम्समध्ये दाखल

  • आरएसएस प्रमुख मोहन भागवत दिल्लीला रवाना
  • वाजपेयीजी लवकर बरे व्हावेत- राहुल गांधी

  • थोड्याच वेळात मेडिकल बुलेटीन जारी करण्याची शक्यता
  • लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन एम्स रुग्णालयातून बाहेर पडल्या
  • एम्स रुग्णालयातून पंतप्रधान नरेंद्र मोदी बाहेर पडले
  • वाजपेयी यांच्या कुटुंबीयांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली
  • लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन, भाजपाध्यक्ष अमित शाह हे देखील एम्समध्ये पोहोचले
  • अटल बिहारी वाजपेयी यांच्या निवास्थानी भाजपचे नेते दाखल, निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आली आहे

  • भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक रद्द करण्यात आली
  • सुषमा स्वराज देखील एम्समध्ये पोहोचल्या
  • अडीच वाजता पुढील मेडिकल बुलेटीन जाहीर करणार
  • पंतप्रधान मोदी ‘एम्स’मध्ये पोहोचले
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्वीट करून वाजपेयी यांच्या तब्येतीसाठी प्रार्थना केली

  • दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल एम्समध्ये दाखल, वाजपेयींच्या तब्येतीची केली विचारपूस

  • वाजपेयी यांच्या तब्येतीत सुधारणा व्हावी यासाठी शाळांमध्ये विद्यार्थी करताहेत प्रार्थना

  • आपण सारे जण वाजपेयी यांच्या तब्येतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करुया- फारुख अब्दुल्ला

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात एम्समध्ये दाखल होणार
  • केंद्रीय मंत्री नितीन गडकरी दुपारी १ वाजता दिल्लीकडे रवाना होणार
  • बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार दिल्लीला जाणार
  • अर्ध्या तासानंतर आणखी एक मेडिकल बुलेटीन जारी करण्यात येणार असल्याची माहिती

  • अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक, एम्सकडून मेडिकल बुलेटीन जारी
  • एम्सच्या परिसरातील दुकानं हटवली, जागोजागी पोलिसांच्या तुकड्या उभ्या करण्यात आल्या
  • भाजपने पक्षाचे आजचे सर्व कार्यक्रम केले रद्द
  • उत्तराखंड सरकारने आजचे सर्व कार्यक्रम केले रद्द
  • विविध राजकीय पक्षाचे बडे नेते दिल्लीत पोहोचले
  • एम्समध्ये केंद्रीय मंत्रिमंडळातील जवळपास अर्ध्याहून अधिक मंत्र्यांची हजेरी
  • काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही एम्स रुग्णालयात जाऊन वाजपेयी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली

  • ग्वाल्हेरमध्ये आयुर्वेदीक कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी अटल बिहारी वाजपेयी लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केली

  • वाजपेयी यांना लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आलं आहे.
  • पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देखील वाजपेयी यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी एम्समध्ये येणार

  • भाजपचे अध्यक्ष अमित शहा एम्स रुग्णालयात पोहोचले

  • किडनीच्या विकारामुळे वाजपेयी त्रस्त आहेत
  • ९ आठवड्यांपासून वाजपेयींवर रुग्णालयात उपचार
  • सकाळी १०.३० नंतर वाजपेयी यांच्या प्रकृती बाबत रुग्णालय प्रशासन माहिती देणार
  • वाजपेयी यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार
  • माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती अजूनही चिंताजनक