एका टेंपोत 8 गायी व 3 बैलांना कोंबून क्रूरतेने वाहतुक करणाऱ्या दोघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रतिकात्मक छायाचित्र

सामना प्रतिनिधी । राहुरी

एका टेंपोत 8 गायी व 3 बैलांना कोंबून त्यांची क्रूरतेने वाहतुक करणाऱ्या जामखेडच्या दोघांवर राहुरी पोलिसांनी प्राण्यांचा छळ व प्राणी रक्षण प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल केला आहे.

नगर मनमाड राज्य मार्गावरील राहुरीच्या पाणी टाकीजवळ गुरूवारी रात्री पोलिसांनी भरधाव वेगाने जनावरे घेऊन जात असलेला टेंम्पो पकडला आहे. ताब्यात घेतलेली 11 जनावरे देखभालीसाठी राहुरी फॅक्टरी येथील गोशाळेत जमा करण्यात आली आहेत.

आबुदर सादिक कुरेशी आणि जावेद शेख, राहणार जामखेड या दोघांनी एम.एच.12 ई.क्यू.9174 या छोट्याशा टेंम्पोत 8 गायी व 3 बैलांना जनावरे कोंबून नगर दिशेला जात असताना पोलिसांना आढळून आले. या दोघांकडे कुठलाही वाहतुक परवाना नसल्याने 11 जनावरे व टेंम्पो जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार डी. बी. जाधव करीत आहेत.