
सामना ऑनलाईन । मुंबई
अनेक मराठी चित्रपटांत रोमँटिक भूमिका साकारलेले अभिनेते अशोक सराफ आगामी ‘हृदयात समथिंग समथिंग’ चित्रपटात लव्हगुरूच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटातील अशोक सराफ यांच्या भूमिकेचे पोस्टर नुकतेच लाँच झाले. अशोक सराफ यांच्या भूमिकेविषयी चित्रपटाचे निर्माते विनोदकुमार जैन म्हणतात, ‘अशोक सराफ यांची ओळख कॉमेडीचा बादशाह आहे. जवळजवळ तीन दशके मराठी चित्रपटातून अशोक सराफ यांना पाहत आलो आहोत. या चित्रपटात ‘लव्ह गुरू’च्या भूमिकेत पाहणे प्रेक्षकांना नक्कीच आवडणार आहे.’ चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण राजा कारळे यांनी सांगितले, ‘ या धमाल विनोदी कौटुंबिक चित्रपटाद्वारे लव्ह गुरू झालेल्या अशोकमामांकडून टीप्स ऐकायला मिळणे खूप मनोरंजक असेल.’ या चित्रपटात अनिकेत विश्वासराव, स्नेहा चव्हाण, प्रियंका यादव, भूषण कडू हेदेखील प्रमुख भूमिकेत आहेत. 5 ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.




























































