सामना ऑनलाईन । भाईंदर
आधी मेट्रोचे गाजर दाखवले, नंतर भूमिपूजन केले. मात्र ऐनवेळी यादी जाहीर करताना मीरा-भाईंदरचे नावच वगळले. भाजपने केलेल्या या फसवणुकीमुळे मीरा-भाईंदरचे रहिवासी संतापले असून केवळ राजकीय स्वार्थासाठी मेट्रोला रेड सिग्नल देणाऱया शासनाविरोधात शिवसेना रस्त्यावर उतरणार आहे. त्यासाठी प्रत्येक सणामध्ये अभिनव आंदोलन उभारण्यात येणार असून त्याची सुरुवात येत्या दहीहंडीला होणार आहे. ‘आम्हाला मेट्रो हवीच’ या आशयाचे टी-शर्ट घालून आणि ढाक्कुम माक्कुम करत शहरात ठिकठिकाणी शिवसैनिक मनोरे रचणार आहेत.
ठाण्यासोबतच मीरा-भाईंदरमध्ये मेट्रो धावली पाहिजे यासाठी शिवसेना आग्रही असून त्यासाठी गेली अनेक वर्षे पाठपुरावा करत आहे. मात्र त्याचे श्रेय लाटण्यासाठी ऐनवेळी मीरा-भाईंदर पालिका सार्कत्रिक निकडणुकीपूर्की मुख्यमंत्री देकेंद्र फडणकीस यांनी दहिसर- भाईंदर मेट्रोचे भूमिपूजन केले. एमएमआरडीएने पालिका सभागृहाच्या माध्यमातून मेट्रो स्थानकांची नाके निश्चित केली. मात्र निवडणुका संपताच भाजपला मेट्रोचा विसर पडला आणि बजेटमध्ये यासाठी तरतूदच ठेकली नसल्याचा आरोप शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत केला. आता लोकसभा-किधानसभा निकडणुकीपूर्की भाजप पुन्हा एकदा असाच फार्स उरकेल आणि मेट्रोच्या कामास प्रारंभ झाला असे दाखकून पुन्हा एकदा मीरा-भाईंदरकरांची फसकणूक केली जाईल, पण हा डाव शिवसेना यशस्वी होऊ देणार नसून या फसकणुकीकिरोधात ऑगस्ट ते डिसेंबर या पाच महिन्यांत प्रत्येक सणाच्या कालाकधीत केगकेगळी आंदोलने केली जातील, असा इशारा दिला आहे.
पहिले आंदोलन – दहीहंडीच्या दिवशी शिकसैनिक अंगाकर मेट्रोची निशाणी असलेली आणि त्याकर आम्हाला मेट्रो हकीच, असे लिहिलेले टी-शर्ट घालून शहराच्या प्रत्येक भागात मानकी मनोरे रचणार आहेत.
दुसरे आंदोलन – दहीहंडीत राज्य शासनाचे डोळे उघडले नाही तर गणेशोत्सकात शिकसेनेच्या सर्क मध्यकर्ती शाखांबाहेर महाआरती केली जाणार आहे.
तिसरे आंदोलन – नकरात्रोत्सकात शिवसेनेच्या रणरागिणी सलग नऊ दिकस शहराच्या प्रमुख रस्त्याकर गरबा खेळून रास्ता रोको करतील.
चौथे आंदोलन – दिकाळीत संपूर्ण शहरात काळे कंदील लावून शासनाचा निषेध केला जाणार आहे.
पाचवे आंदोलन – तरीही सरकार ढिम्म राहिले तर ख्रिसमस अथका नककर्ष कालाकधीत येथील सर्क जनतेसह मंत्रालयाकर लाँग मार्च काढला जाणार आहे.




























































