
सामना ऑनलाईन । मुंबई
मुंबई क्राइम ब्रँचच्या जापू शाखेने आज नागपाड्याच्या मदनपुरा परिसरात असलेल्या एका कारखान्यात मजुरीला जुंपलेल्या तिघा अल्पवयीन मुलांची सुटका केली. ते तिघेही 13 वर्षांचे असून मूळचे नेपाळचे आहेत. मदनपुरा परिसरात असलेल्या काचवाला कंपाऊंडमधील एका कारखान्यात काही बालकामगार असल्याची खबर जापू शाखेला मिळाली. त्यानुसार जापू शाखेच्या पथकाने त्या कारखान्यावर धडक दिली असता तेथे तीन बालके काम करत असताना सापडली. पोलिसांनी त्या तिन्ही बालकांची मजुरीच्या दलदलीतून मुक्तता करून कारखाना मालकाला अटक केली. याप्रकरणी नागपाडा पोलीस ठाण्यात कारखाना मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




























































