पूरग्रस्तांच्या मदतीसाठी खेडमधील रेस्क्यू टिम केरळला जाणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। खेड

केरळमध्ये पावसाने थैमान घातले असून पूरात अडकलेल्यांना मदतीचा हात देण्यासाठी खेडवासीयांना पुढाकार घेतला आहे. खेडची रेस्क्यू टिम २३ ऑगस्ट रोजी केरळ येथे रवाना होणार आहे.

याबाबत माहिती देताना टिमचे अध्यक्ष बुरहाण टांके यांनी सांगितले की, अपादग्रस्तांना मदत करण्याच्या हेतूनेच रेस्क्यू टिमची स्थापना करण्यात आली आहे. खेड व परिसरात आतापर्यंत जिथे आपत्तीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली त्या ठिकाणी रेस्क्यू टिमच्या सदस्यांनी धाव घेऊन अपादग्रस्तांना मदतीचा हात देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.

रात्री अपरात्री कधीही अपघात झाला की रेस्क्यू टिम ऑफ खेड, आणि मदत ग्रुपचे सदस्य तात्काळ घटनास्थळी धाव घेतात. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना रुग्णवाहिकेने नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्याचे काम या देवदूतांकडून केले जाते. मदत ग्रुप व रेस्क्यू टिम ऑफ खेडच्या सदस्यांमुळे आतापर्यंत अनेक जखमींचे प्राण वाचलेले आहे.

२८ जुलै रोजी पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात दापोली कृषीविद्यापीठ कर्मचाऱयांच्या बसला अपघात होवून ३० प्रवाशांचा बळी गेला होता. या अपघातादरम्यान बचत कार्यामध्ये खेडची रेस्क्यू टिम व मदत ग्रुपचे सदस्य आघाडीवर होते.

मुसळधार पावसामुळे सध्या केरळ मध्ये महापुर आलेला आहे. तेथील अनेक जिल्हे जलमय झाले असून संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. तेथील पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी खेडमधील रेस्क्यू टीम खेड’२३ ऑगस्ट रोजी केरळला रवाना होणार आहे. केरळी बांधवाना मदतीचा हात देण्यासाठी खेडमधील उद्योजक, व्यापारी, स्वयंसेवी संस्था यांनी आर्थिक सहकार्य करावे असे आवाहनही करण्यात आले आहे.

summary…khed rescue team going to kerala