निलंगा येथे सव्वा लाखाचा गुटखा जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी। लातूर

सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासनाने लातूर येथील निलंगातील मारवाडी गल्लीत केलेल्या कारवाईत सव्वा लाखाचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. दिनेश दगडूलाल अट्टल याच्या घरातून हा गुटखा जप्त कऱण्यात आला आहे.

सहायक आयुक्त प्र.द. गळाकाटू यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नसुरक्षा अधिकारी वि.स. लोंढे, अ.मा. तम्मडवार यांनी ही कारवाई केली आहे. यावेळी अट्टल याच्या घरातून के.एफ.गुटखा व गोवा १००० या प्रतिबंधीत अन्नपदार्थाचा (किंमत १,२७,०५० रुपयाचा) साठा सापडला. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी हा साठा जप्त करून अन्न कायदा २००६ व नियम, नियमन २०११ अंतर्गत कारवाई केली आहे, अशी माहिती अन्न औषध प्रशासन कार्यालयातर्फे देण्यात आली आहे.

summary…gutkha seized in latur