उत्तर प्रदेशमध्ये विजेचा शॉक देऊन नरबळी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । गोरखपूर
जिल्ह्यातील कुशीनगर भागात एका आठ वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी काळी जादू करणार्‍या दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली आहे. शनिवारी रात्री दोन वाजता जंगल लाल छपरा गावात मुलाचा मृतदेह आढळल्यावर वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

मृत मुलाचे नाव नीरज असून शनिवारी दुपारपासून तो बेपत्ता होता. रात्री उशिरा महेंद्र पांडे यांच्या घरात खणलेल्या खड्ड्यात त्याचा मृतदेह सापडला. महेंद्र पांडे आणि त्याची बायको फूल कुमारी यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला पण गावकर्‍यांनी त्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. नीरजच्या अंगावर विजेचे शॉक दिल्याच्या खुणा असल्याचे वडिलांनी सांगितले. नीरजचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवल्याची माहिती पोलीस निरीक्षक गोपाल पांडे यांनी दिली. तसेच महेंद्र आणि फूल कुमारी यांच्यावर खुन आणि अपहरणाचे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.