
सामना प्रतिनिधी, मुंबई
दहिसर गावठाण येथे राहणारे आनंद राऊत यांना रविवार रात्रीचे हॉटेलचे जेवण भलतेच महागात पडले. हॉटेलमध्ये जेवल्यानंतर त्यांनी एटीएम कार्डने बिल भरले. त्यानंतर ते घरी पोहचत नाहीत तेच त्यांच्या कार्डवरून 36,600 रुपये काढल्याचे दोन मेसेज आले. कार्ड तर त्यांच्याकडेच होते पण तरी देखील पैसे काढल्याची घटना दहिसर पश्चिमेला घडली.
दहिसर पश्चिमेला असलेल्या ‘राधेकृष्ण’ हॉटेलात रविवारी रात्री आनंद राऊत हे जेवायला गेले होते. त्यांनी त्यांच्या ‘एचडीएफसी’ बँकेच्या एटीएम कार्डवरून 290 रुपयांचे बिल भरले. त्यानंतर ते घरी परतले. तासाभराने त्यांच्या मोबाईलवर बँक खात्यातील 36,000 रुपये काढल्याचा मेसेज आला. त्यानंतर लगेच 600 रुपये काढल्याचा मेसेज आला. अवघ्या दोन मिनिटांत बँक खात्यातून 36,600 रुपये काढण्यात आले होते. त्यानंतर त्याचे कार्ड ब्लॉक देखील करण्यात आले. याप्रकरणी आनंद राऊत यांनी एमएचबी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे.
summery- dinner in hotel resulted into atm scam





























































