
सामना ऑनलाईन, संभाजीनगर
गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात होत असलेल्या पावसाने ५ जिल्ह्यांना झोडपून काढलं आहे. मराठवाडा विभागात एका दिवसात 42.55 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची एकूण टक्केवारी 95 असून ती वार्षिक सरासरी 58.26 टक्के आहे. या जोरदार पावसामुळे नांदेड जिल्ह्यात हाहाकार माजला असून या जिल्ह्यातील 69 मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे . विभागातील 421 पैकी 90 मंडळात अतिवृष्टी झाली आहे
मराठवाडा विभागातील सर्वाधिक पाऊस नांदेड जिल्ह्यात नोंदवण्यात आला आहे. येथे एका दिवसात सरासरी 80.35 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. हिंगोली जिल्ह्यात बारा मंडळात 62 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. हिंगोलीत आत्तापर्यंत 643 मिलिमीटर पाऊस झाला असून तो वार्षिक सरासरीच्या 72% इतका आहे. परभणीच्या ४ तर संभाजीनगरच्या 3 मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. मराठवाडा विभागात आणखी दोन दिवस पावसाचा जोर राहील असा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे.





























































