रायबरेलीत चौकीदाराची हत्या करून गुप्तांग छाटले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । रायबरेली

उत्तर प्रदेशातील रायबरेलीमध्ये घराबाहेर झोपलेल्या चौकीदारावर हल्लेखोरांनी हल्ला करून त्याला ठार केले. यावरच ते थांबले नाहीत. त्यांनी क्रौर्याची परिसीमा गाठत चौकीदाराचे गुप्तांग छाटले आणि ते पसार झाले. या घटनेचे वृत्त परिसरात पसरताच संतप्त जमावाने चार तास लखनऊ- अलाहाबाद महामार्गावर रास्तारोको केला. त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी चौकीदाराच्या भावाने दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल केला असून तपासाला सुरुवात केली आहे.

सोमवारी रात्री सुमारे 6-7 सशस्त्र हल्लेखोर परिसरात आले. त्यांनी घराबाहरेच्या ओट्यावर झोपलेले चौकीदार धमेंद्र कुमार गौतम ( 48) आणि त्यांचा साथीदार घनश्याम यांच्यावर हल्ला केला. घनश्याम यांच्या डोळ्यावर पट्टी बांधून त्यांना बाजूच्या खोलीत कोंडून ठेवले. त्यानंतर धमेंद्र कुमार यांची क्रूरतेने हत्या केली. त्यानंतर त्यांनी क्रौर्याची परिसीमा गाठत धमेंद्र कुमार यांचे गुप्तांग छाटले आणि पसार झाले. धमेंद्र कुमार अमेठी जनपद येथील सर्विलांस सेलमध्ये तैनात होते. दोन दिवसांची सुटी घेऊन ते घरी आले होते. ते मूळचे मढिगवा गावचे आहेत.

घटनेची माहिती मिळताच जवळच्या गावातील शेकडो लोक घटनास्थळी दाखल झाले. संतप्त जमावाने लखनऊ- अलाहाबाद महामार्गावर सुमारे चार तास रास्तारोको केला. पोलीस आणि प्रशासनाविरोधात यावेळी नारेबाजी करण्यात आली. पोलिसांनी चौकशी करणार असून दोषींना शिक्षा करण्याचे आश्वासन देत जमावाला शांत केले. त्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली. मृत चौकीदाराचा भाऊ वीरेंद्र कुमार यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी अज्ञात हल्लेखरांविरोधात गुन्हा दाखल केला असून तपासला सुरुवात केली आहे. त्यानंतर चौकीदाराचा मृतदेह शवविच्छदेनासाठी पाठवण्यात आला आहे. चौकीदाराच्या हत्येवेळी दुसरा चौकीदार कुठे होता. दुसऱ्या खोलीत त्याला डांबण्यात आले होते. मग तो सकाळी बाहेर कसा आला आणि त्याने घटनेबाबतची माहिती कशी दिली. रात्रभर तो कुठे होता असे सवाल उपस्थित होत आहेत. याबाबत सखोल तपास करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.