काँग्रेस नेते गुरुदास कामत यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष गुरुदास कामत यांचे निधन झाले आहे. ते ६३ वर्षांचे होते. दिल्लीतील चाणक्यपुरीतील प्रायमस रुग्णालयात त्यांचे निधन झाले आहे. ह्रदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना आज सकाळीच रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.