मनीषा आणि मिलिंद म्हैसकर यांच्या घरी जुळ्या मुलींचा जन्म

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

आयएएस अधिकारी मनीषा म्हैसकर आणि मिलिंद म्हैसकर यांच्या घरी जुळ्या मुलींचं आगमन झालं आहे. आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या मदतीने मनीषा म्हैसकर यांनी मुंबईत जुळ्या मुलींना जन्म दिला. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सरोगेट मदरच्या माध्यमातून म्हैसकर कुटुंबात दोन चिमुकल्या जन्मल्या.

मिलिंद म्हैसकर म्हाडाचे उपाध्यक्ष आणि सीईओ आहेत, तर मनीषा म्हैसकर नगर किकास किभागात प्रधान सचिव म्हणून कार्यरत आहेत. मुलगा मन्मथ याच्या आत्महत्येनंतर डिसेंबर 2017 मध्ये म्हैसकर दाम्पत्याने पुन्हा एकदा पालकत्व स्कीकारण्याचा निर्णय घेतला. याविषयी अत्यंत गुप्तता पाळण्यात आली होती. केवळ म्हैसकर दाम्पत्याच्या निकटवर्तीयांनाच याची माहिती होती. प्रसिद्धीमाध्यमांनाही या बातमीपासून दूरच ठेवण्यात आले होते. अखेर ही आनंदाची बातमी समजलीच. देवाचे आशीर्वाद आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळेच आपली रीती ओंजळ भरल्याच्या भावना मनीषा म्हैसकर यांनी व्यक्त केल्या.