राहुरीतील तरूणाच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । राहुरी

राहुरी तालुक्यातील वळण येथील मंगेश खिलारी या तरूणाच्या निर्घृण खुनानंतर फरार झालेले अमोल भाऊसाहेब कुलट व किरण उत्तम बर्डे या दोघांना गुरूवारी मध्यरात्री जेरबंद करण्यात पोलिसांना य़श आले असुन पोलीस तपासात या दोघांनी खुनाची कबुली दिली आहे.

राहुरी तालुक्यातील वळण मांजरी शिवेवर मंगेश खिलारी वय २२ या तरूणाच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकुन गुप्ती व धारदार चाकूने शरीरावर २२ वार करून अमानुषपणे ठार मारण्यात आले होते.

क्रिकेट खेळातून मोबाईलवर झालेल्या चॅटींग वरून त्यांच्यात वादाला तोंड फुटले. या घटनेचे पर्यवसान खुनात झाले. या घटनेनंतर मयत मंगेशचे चुलते सतीश रघुनाथ खिलारी यांनी गावातील तरूणांवर संशय व्यक्त करत राहुरी पोलिसांत फिर्याद दिल्याने जिल्हा पोलीस प्रमुख रंजनकुमार शर्मा, श्रीरामपुर विभागाचे पोलीस उपअधिक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी तपासाची चक्रे फिरवुन किरण पोपट कुलट, प्रशांत नारायण शिकरे, सचिन नंदु जाधव, किशोर बाळासाहेब खुळे, लखण बाळासाहेब खुळे, दादा कुलट या सहा जणांना अटक केली होती.व रील ६ आरोपींना राहुरी न्यायाल्यात उभे केले असता ३१ ऑगष्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.