
सामना प्रतिनिधी । न्हावा शेवा
उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार मनोहर भोईर यांच्या सौजन्याने तसेच शिवसेना तालुकाप्रमुख संतोष ठाकूर यांच्या विशेष प्रयत्नांनी चिरनेर येथील पी. पी. खारपाटील एज्युकेशन सोसायटीचे परशुराम धाकु खारपाटील माध्यमिक शाळा चिरनेर इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना टॅब वाटप कार्यक्रम संपन्न झाला.
आमदार मनोहर भोईर यांच्या हस्ते टॅब वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना उरण तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर मोकल, पी.पी. खारपाटील, सागर खारपाटील, समीर खारपाटील, विभागप्रमुख अनिल पाटील, ग्रा. सं. शशांक ठाकूर, शिवधन पतसंस्था गणेश म्हात्रे, गजानन वशेणीकर, शाखाप्रमुख सचिन म्हात्रे, ग्रा.पं.सदस्य धनेश ठाकूर, ग्रा.पं.स. धर्मेंद्र म्हात्रे, ग्रा.पं.स. विनंती फुंडेकर, ग्रा.पं.स. प्रतिक्षा मोकल, ग्रा.पं.स. संध्या नारंगीकर, ग्रा.पं.स. संध्या पाटील, ग्रा.पं.स. शुभांगी महाले, उपजिल्हासंघटक ज्योती म्हात्रे, हरिश्चंद्र फोफेरकर, समाधान ठाकूर, निनाद फोफेरकर, दीप्ती फोफेरकर, विलास ठाकूर, राजेंद्र म्हात्रे, सुरेश केणी, चांगदेव जोशी, सदानंद पाटील, शिवसेनेचे सर्व आजी माजी ग्रामपंचायत सदस्य व सर्वं शिवसैनिक परशुराम धाकु खारपाटील माध्यमिक शाळेचे शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
































































